मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या नजरेने घायाळ करणा-या अभिनेत्री प्रिया वारीयरने लोकप्रियतेच्या बाबतीत चक्क सनी लिओनलाही मागे टाकलंय. दोन दिवसांमध्ये प्रिया वारियरला गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे.


बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टाकले मागे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा लवकरच सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमातील एका गाण्यातील छोट्या सीनमुळे गेल्या दोन दिवसात प्रिया वारियरला गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलंय. प्रियाने केवळ सनीलाच नाही तर सनीसोबतच कतरीना कैफ, आलिया भट्ट आणि दीपिका पादुकोण यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रींनीही मागे टाकलंय. 



(Image Credit : www.newsx.com)


कोण आहे प्रिया वॉरिअर?


प्रिया अवघी १८ वर्षांची असून केरळमधील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. ओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम सिनेमातून प्रिया पदार्पण करत आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं. व्हायरल झालेली क्लीप याच गाण्यातील आहे.