मुंबई : 'ओरु अदार लव' या मल्याळम चित्रपटातून अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर पदार्पण करत आहे. पण चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याआधीच या चित्रपटाच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या गाण्यामध्ये प्रियाच्या एक्स्प्रेशन्सनी अनेकांना घायाळ केलं आहे. या एका गाण्यामुळे प्रिया प्रकाश वॉरियर हे नाव काही तासांमध्येच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्धी मिळाल्यानंतर लगेचच प्रिया प्रकाश वॉरियरला काही चित्रपटांच्या ऑफरही आल्या. पण प्रियानं या ऑफर नाकारल्या आहेत. ओरु अदार लव या चित्रपटाचं शूटिंग अजूनही संपलेलं नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत मी कोणत्याही चित्रपटाची ऑफर स्वीकारणार नाही, असं प्रियानं स्पष्ट केलं आहे. तसंच दिग्दर्शकांनी माझ्यासारख्या दुसऱ्या चेहऱ्यांनाही संधी दिली पाहिजे आणि त्यांच्या ऑडिशन घेतल्या पाहिजेत, असं प्रिया म्हणाली आहे.


चित्रपटाच्या गाण्यामुळे मी प्रकाशझोतात आले. या इंडस्ट्रीनं माझं स्वागत केलं, त्यामुळे मी खुश आहे. माझ्या प्रसिद्ध होण्याचं श्रेय चित्रपटाचे दिग्दर्शक ओमार लुलुला देते, अशी प्रतिक्रिया प्रियानं दिली आहे.