नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोणाची हवा असेल तर ती म्हणजे प्रिया प्रकाश वारियर. तिच्या एका व्हिडिओने अनेक तरुणांना मोहिनी घातली. तिचे व्हिडिओज इतके पटकन व्हायरल झाले की रातोरात ती प्रसिद्ध झाली. एका रात्रीत तिचे इंस्टाग्रामवर ६ लाखांहुन अधिक फॉलोव्हर्स झाले. प्रिया मल्यालम चित्रपट ओरू अदार लव यातून डेब्यू करत आहे. या चित्रपट शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे.


यामध्ये ठरली अव्वल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार प्रिया प्रकाश गुगल सर्चमध्ये अव्वल ठरली आहे. तिने चक्क सनी लियोनीला मागे टाकले आहे. तिची लोकप्रियता इतकी वाढली आहे की फक्त सनीच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफलाही तिने मागे टाकले आहे.



तिचे अनेक दिवाने पण ती याच्यासाठी वेडी


मीडिया रिपोर्टनुसार, प्रियाचा जन्म केरळमधील त्रिशूर येथे झाला. रातोरात प्रसिद्ध झालेली ही व्हायरल गर्ल सध्या त्रिशूर येथील विमला कॉलेजमध्ये बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. ओरू अदार लव या चित्रपटात ती एका विद्यार्थीनीची भूमिका साकारत आहे. तिला स्पोर्ट्सची आवड असल्याचे तिने सांगितले. इतकंच नाही तर एका मुलाखतीत तिने सांगितले की, क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिला प्रचंड आवडतो.