Priyanka Chopra and Adinath Kothare : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही परदेशात स्थायिक झाली असली तरी देखील तिचं भारतावर असलेलं प्रेम आणि त्यातही इथल्या चित्रपटसृष्टीवर किती प्रेम आहे हे माहित आहे. काही वर्षांपूर्वी प्रियांका व्हेंटिलेटर हा मराठी चित्रपट बनवला होता. आता पुन्हा एकदा प्रियांका एक मराठमोळा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन आणि राजश्री एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरंतर या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून येत्या 18 ऑक्टोबर रोजी 'पाणी' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आदिनाथ कोठारे दिग्दर्शनात पदार्पण करत असून राजश्री एंटरटेन्मेंटसारखा मोठा बॅनर, इंटरनॅशनल आयकॉन अशी ख्याती असणारी प्रियांका चोप्रा आणि महाराष्ट्राची शान असलेले कोठारे व्हिजन प्रा. लि. असे तिन्ही मोठे निर्माते एकत्र येत आहेत. या तिघांच्या एकत्र येण्यानं मराठी सिनेसृष्टीला एक सर्वोत्कृष्ट चित्रपट अनुभवायला मिळणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची कथा असणाऱ्या 'पाणी'मध्ये आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. 


या चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक प्रियांका चोप्रा जोनस म्हणाली, ''पाणी हा सगळ्यांसोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. एक कमालीचा प्रोजेक्ट करत असल्यानं आम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. पाणी सारखा विषय चित्रपटात मांडताना खूप छान वाटतं आहे. हा चित्रपट खास आहे कारण तो बनवणे आव्हानात्मक होत परंतु आपण ज्या काळात राहतो त्या काळासाठी खूप प्रासंगिक आहे. ही एक प्रेरणादायी कथा आहे ज्यानं ज्याने आपल्या आजुबाजुच्या सर्वांच्याच जीवनात आमुलाग्र बदल घडवला. पाणी हा एक मनोरंजक, प्रेरणादायी चित्रपटाचे एक ज्वलंत उदाहरण आहे. मला आदिनाथच्या उल्लेखनीय दिग्दर्शनाचा खूप अभिमान आहे. संपूर्ण टीमनं त्यांच्या कष्टाने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन! आमचा हा चौथा मराठी निर्मिती सहयोग होणं ही नक्कीच खास गोष्ट आहे आणि राजश्री एंटरटेनमेंट आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड आम्ही चांगले भागीदार आहोत यात शंका नाही.'


दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणतो, 'प्रियांका चोप्रा जोन, राजश्री एंटरटेन्मेंट यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे माझ्यासाठी एक मोठी संधी होती. माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाच्या चित्रपटाला अशी टीम लाभणे, हे मी माझे भाग्य समजतो.  'पाणी' लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होईल आणि संपूर्ण टीमला विश्वास आहे की हा एक अनुभव असेल जो दीर्घकाळ प्रेक्षकांसोबत राहील.'


हेही वाचा : बिग बींसोबतच्या रोमॅन्सविषयी जया बच्चन मोकळेपणाने बोलल्या तेव्हा...


राजश्री एंटरटेनमेंट मधील नेहा बडजात्या म्हणतात, 'राजश्री एंटरटेनमेंटचा हा पहिला मराठी चित्रपट आहे, आणि पाणी हा चित्रपट अग्रेसर आहे याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. हा चित्रपट पाणीटंचाईच्या महत्त्वाच्या समस्येवर भाष्य करतो. त्याच्या उत्तम विषयासह आणि प्रतिभावान टीमसह, पाणी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. एक सामाजिकदृष्ट्या संबंधित चित्रपट या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल असा आम्हाला विश्वास आहे.'