मुंबई : बॉलीवूडची देसी गर्लने हॉलीवूडमध्ये देखील आपली छाप सोडली आहे. बेवॉचमध्ये तिच्या अॅक्टींगने सगळेच प्रभावित झाले आहेत. प्रियंका चोपडा सध्या आपल्या आगामी हॉलीवूड सिनेमा ‘इंजट इट रोमाटिंक’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. पण सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरिकन पोलिसांनी तिला पकडलं आहे. असे हे फोटो व्हाय़रल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी सिनेमात प्रियंका एका योगा अॅम्बेसेडर इसाबेलाचा रोल करत आहे. याची शूटिंग न्यूयॉर्कमध्ये सुरु आहे. ज्य़ाचे काही फोटो सध्या सोशल मीडिय़ावर व्हायरल होत आहे. लोकप्रिय टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या २ सीजनमध्ये भूमिका करत अनेकांचं मन जिंकणाऱ्या प्रियंकाने आता तिसऱ्या सिरीजच्या शूटींगची तयारी सुरु केली आहे. आज जे फोटो व्हायरल होत आहे ते त्य़ाच शूटींगच्या दरम्यानचे आहेत. ‘क्वांटिको’मध्ये प्रियंका एका FBI मेंबरचा रोल करत आहे. या दरम्यानच हे फोटो घेण्यात आले आहेत.


'क्वांटिको' शिवाय प्रियंका हॉलीवूडमधील 'बेवॉच'नंतर आपला दुसरा हॉलीवूड सिनेमा 'इजंट इट रोमांटिक'साठी सज्ज आहे. न्यूयॉर्कमध्ये जेव्हा याची शूटींग सुरु झाली होती तेव्हा देखील शूटींग दरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते.