मुंबई : प्रियांका चोप्राने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती जखमी अवस्थेत दिसत आहे. तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूला रक्ताचे डाग दिसत आहेत. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर दिसणारे रक्ताच्या डागावरुन हे समजतं की, ती गंभीररित्या जखमी झाली आहे. प्रियांकाने आपला हा फोटो शेअर करत लिहीलं होतं की, ''मला आश्चर्य वाटतं की मी गेल्या काही वर्षांत मी कामावर किती रक्ताचे फोटो पोस्ट केले आहेत.''   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकाचा हा फोटो देख चाहते चांगलेच चिंतेत आहे. जसा प्रियांकाचा हा फोटो समोर आला लोकं अभिनेत्रीच्या तब्येतबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मंगळवारी प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीजवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूला जखम झाली आहे. फोटोत दिसणाऱ्या जखमा पाहून असं दिसतंय की, तिला बऱ्याच ठिकाणी मार बसलाय. 


प्रियांका 'हेड्स ऑफ स्टेट्स'मध्ये काही हाई-ऑक्टेन स्टंट करताना दिसली ज्यामध्ये जॉन सीना आणि इदरीस एल्बादेखील आहेत. ही एक कॉमेडी एक्शन फिल्म आहे. प्रियांकाला स्टंट करताना या जखमा झाल्या असाव्यात असा अंदाज बांधला जातोय. प्रियांकाने एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहीलंय की, "मला आश्चर्य वाटतंय की, मी गेल्या काही वर्षांत कामाशी संबंधित किती रक्तरंजित फोटो पोस्ट केले आहेत."


सध्या फ्रान्समध्ये सिनेमाचं शूटिंग दरम्यान प्रियांका तिच्या प्रवासाच अनेक BTS व्हिडीओ आणि फोटो पोस्ट शेअर करत आहे. या प्रवासात तिची मुलगी मालती मैरी जोनसदेखील त्यांच्यासोबत दिसत आहे. तिने तिच्या मुलीला उन्हापासून वाचण्यासाठी टोपीदेखील घातली आहे. यादम्यान तिची लेक उन्हाळ्याचा आनंद घेताना दिसली. 




 
याआधीही ऑन सेट जखमी झाली होती प्रियांका
हे पहिल्यांदा नाही जेव्हा प्रियांकाने आपले स्टंट स्वत: केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या शेवटच्या चित्रपटात रिचर्ड मॅडनसोबत तिचे 80 टक्के स्टंट केले होते. एका मुलाखतीत बोलताना प्रियांकाने सांगितलं होतं की, शोमध्ये लगभग ८० % स्टंट मी स्वत: केले कारण मला माझं शरिर आणि माझ्या प्रवृत्तीवर विश्वास आहे. मात्र मी खूप काही शिकले आहे आणि या शोमध्ये मी जे स्टंट केले आहेत ते  मी आधी केलेल्या स्टंटपेक्षा खूपच वेगळे आहेत.


प्रियांकाचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना तिच्याविषयी चिंता वाटत आहे. जसा प्रियांकाचा हा फोटो समोर आला लोकं अभिनेत्रीला तिच्या तब्येतीविषयी विचारपूस करु लागले. प्रियांका, तिचा पती आणि तिची लेक मालती मार्च महिन्यात होळीच्या निमीत्ताने भारतात आले होते. तर निलम उपाध्यायसोबत तिचा भाऊ सिद्धार्थ चोपडासोबत साखरपुड्यात सामिल झाली होती.