मुंबई : निक जोनसचं भारतात स्वागत करत प्रियंका चोप्राने या आनंदात एका खास पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीत प्रियंका चोप्रा, निक जोनस आणि त्यांच्या अगदी जवळचे कुटुंबिय होते. डिनर पार्टीचा फोटो स्वतः प्रियंकाने शेअर केला आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत लांब टेबलजवळ सगळे पाहुणे बसलेले दिसत असून प्रियंका चोप्रा आणि निक जोनस अगदी शेवटी बसले आहेत. या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंदच सगळ्या गोष्टी सांगत आहे. हा फोटो शेअर करताना प्रियंका चोप्राने Happy Thanks Giving... Family.... Forever 




तसेच या अगोदर प्रियंकाने निकसोबत कारच्या आतील एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर तिने मॅसेज लिहिलं आहे. वेलकम होम बेबी.... भारतात येण्याअगोदर निक देखील खूप उत्साही दिसला. त्याने इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला होता.