मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच बिझी असल्याने तिचे भारतीय चाहते तिला फारच मिस करत आहेत. पण आता प्रियंकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रियंका एका अफलातून सिनेमातून कमबॅक करण्यास सज्ज झालीये. 


प्रियंकाच्या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंकाच्या चोप्राच्या गाजलेल्या ‘एतराज’ या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. या सिनेमाची तिला ऑफर देण्यात आलीये. तिच्या कमबॅकसाठी यापेक्षा चांगलाच पर्याय काय असू शकतो. 


सिनेमाची स्क्रिप्ट


एका इंग्रजी वेबसाईटनुसार, सुभाष घई ‘एतराज’ सिनेमाच्या सिक्वेलच्या स्क्रिप्टची तयारी करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून घई ‘एतराज २’ची स्क्रिप्ट तयार करत आहेत आणि आत्ताच त्यांनी स्क्रिप्ट फायनल केलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एतराज २’मध्ये नवीन कथानक असणार आहे. आधीच्या सिनेमाशी या कथानकाचं काहीच देणंघेणं नाहीये. 


प्रियंकाची भूमिका


दिग्दर्शक सुभाष सई आणि प्रियंका चोप्रा यांच्यात ‘एतराज २’ बाबत मिटींग झाली होती. यात दोघांनी सिनेमाच्या कथानकाबाबत चर्चा केली. एतराजच्या सिक्वेलची आयडिया प्रियंकाला पसंत आली. याआधीच्या सिनेमात प्रियंकाच्या निगेटीव्ह भूमिकेने चांगलीच प्रशंसा मिळवली होती. आता पुन्हा प्रियंका सिक्वेलमध्ये काम करण्यासाठी चांगलीच उत्सुक आहे. 


कधी येणार एतराज २?


सध्या प्रियंकाने हॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवला आहे. बॉलिवूडमध्ये ब-याच काळापासून प्रियंकाने सिनेमाही केला नाहीये. सध्या ती हॉलिवूडच्या ‘अ किड लाइक जेक’ आणि ‘इजंट इट रोमॅंटिक’ यावर काम करतीये. त्यानंतर एतराजचं काम सुरू होणार आहे.