मुंबई : जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने कलाविश्वात २० वर्ष पूर्ण केली आहेत. मिस वर्ड ठरलेल्या प्रियंकाने २००३ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यानंतर तिने आपला अभिनयाचा प्रवास असाच सुरू ठेवला. यशाकडे वाटचाल करणाऱ्या प्रियंकाने मागे वळून पाहिले नाही. 'हीरोः द स्टोरी ऑफ ए स्पाई' या चित्रपटाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली. तिने तिचा प्रवास फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित ठेवला नाही, तर पुढे हॉलिवूडमध्ये देखील तिने स्वतःचं नाव मोठं केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाविश्वात  दोन दशक पूर्ण केल्याचा आनंद तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोशल मीडियावर तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रवास अधोरेखीत केला आहे. 



व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'मनोरंजन क्षेत्रात मी २० वर्ष पूर्ण केली आहेत. जओजी प्रॉडक्शन आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद... मला सर्वांना भेटण्याची इच्छा आहे. हा क्षण साजरा करण्याची माझी इच्छा आहे.' असं तिने लिहलं आहे. 


मनोरंजनासोबतच प्रियंकाने अनेक सामाजिक कार्यांमध्ये मोलाचे  योगदान दिले आहे. शैक्षणिक क्षेत्र, महिला सशक्तिकरण अशा अनेक कर्यात ती अग्रेससर असते. प्रियंकाने 'अंदाज', 'ऐतराज', 'मुझसे शादी करोगे', 'डॉन', 'दोस्ताना', 'बर्फी', 'कमीने',  'मेरी कॉम', 'सात खून माफ' अशा ५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. 


त्याचप्रमाणे ‘Baywatch’, ‘Quantico’ आणि ‘Isn’t it romantic’ अशा हॉलिवूड प्रोजेक्ट मध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे.