मुंबईः देसी गर्ल प्रियांका-चोप्रा विदेशी राजकुमारासोबत लग्न करून परदेशात स्थायिक झाली. लग्नानंतर ज्याचे सर्वांना वेध लागतात ती गूड न्यूजही प्रियांकाने या वर्षाच्या सुरुवातीला दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सरोगसीद्वारे या जोडीने आपल्या बाळाला जन्म दिला. तेव्हापासून प्रियांकाला या बाळाचं नाव काय ठेवलं असा प्रश्न तिच्या चाहत्यांकडून विचारला जात होता. अखेर या बाळाचं नाव समोर आलेलं आहे.



सरोगसीद्वारे आपल्याला मुलगा झाला की मुलगी हे प्रियांकाने उघड केलं नव्हतं मात्र, आता बर्थ सर्टिफिकेट समोर आल्यानंतर प्रियांकाच्या घरी नन्ही परी आल्याचं समोर आलंय आणि या मुलीचं नाव आहे मालती मेरी चोप्रा जोनास.



मुलीचा जन्म 15 जानेवारीला रात्री 8 वाजता कॅलिफोर्नियामध्ये झाला. हिंदू आणि ख्रिश्चन नावाचं एकत्र कॉम्बिनेशन करत या जोडीने आपल्या मुलीचं नाव ठेवलं आहे. 



प्रियांका आणि निकने 21 जानेवारीला आपल्या घरी सरोगसीद्वारे बाळाचं आगमन झाल्याचं सांगितलं होतं. खरंतर 12 आठवडे आधीच बाळाचा जन्म झाला होता. मालती-मेरी ही प्री-मॅच्युअर बेबी आहे. त्यामुळे जन्मानंतर लगेगच तिला काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं.