मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा होणारा नवरा निक जोन्स २५ मिलियन डॉलर (११७ कोटी रुपये) संपत्तीचा मालक आहे. पण त्याचे वडिल आणि प्रियांकाचे होणारे सासरे पॉल जोन्स यांच्यावर फार मोठं कर्ज आहे. टीएमजेड वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार प्रियांकाच्या होणाऱ्या सासऱ्यांच्या रियल इस्टेट कंपनीवर १० लाख डॉलर (७ कोटी रुपये) हून जास्त कर्ज आहे. यामध्ये त्यांची कंपनी एक कायदेशीर प्रकरण हारल्यानंतर झालेलं २.६८ लाख डॉलर (१ कोटी ८९ लाख) चं कर्जही आहे.


लाखो गाणी विकली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार पॉल जोन्स यांनी २०१३ मध्ये जोन्स ब्रदर्स ब्रॅण्ड संपण्यापूर्वी जगभरात लाखो गाणी विकली होती. यामध्ये निक्सदेखील भागीदार होता. ब्रॅण्ड संपुष्टात आल्यानंतर तीनही मेंबर्सने आपआपल्या क्षेत्रात काम करणं सुरू ठेवलं. गेल्यावर्षी रिलीज झालेल्या 'जुमानजी' च्या रिमेकमध्ये निक दिसला होता. 


म्युझिक बॅन्ड  


भाऊ जो, केविन सह निकने त्यांचा खास म्युझिक बॅन्ड बनवला. जगभरात हे जोनास त्रिकुट 'द जोनस ब्रदर्स' या नावाने एकत्र कार्यक्रम  करतात. निक 13 वर्षांचा असताना It's about time हा निकचा अल्बम डिस्नेवर लोकप्रिय ठरला.


२०१४ साली बॅन्डपासून वेगळे होऊन निकने त्याचा स्वतंत्र अल्बम लॉन्च केला. Careful what you wish for या सिनेमात निकने काम केले आहे. अमेरिकन सीरीज क्वांटीकोच्या सेट्सवर प्रियांका आणि निकची भेट झाली.


निक्सची आजाराबाबत जनजागृती 


 २०१४ साली ब्रिटीश मासिक OK आणि २०१५ साली अमेरिकन मासिक People's ने निकचा Sexiest Men Alive या किताबाने गौरव केला आहे. प्रियांका चोप्रा पूर्वी निकचे जगभरातील इतर अनेक मुलींसोबत रिलेशनशीपमध्ये होता.


यामध्ये प्रसिद्ध अमेरिकन गायिका मायली सायरस, सेरेना गोमेझ अशा गायक, अभिनेत्रींचाही समावेश होता. निक १३ वर्षांचा असताना त्याला टाईप १ डाएबेटीसचं निदान झालं. यानंतर त्याने 'चेंज फॉर चिल्ड्रन फाउंडेशन' ची निर्मिती करून या आजाराबाबत समाजात जनजागृती करण्याचं काम सुरू केलं आहे.