प्रियंका चोप्राला सतत घ्यावी पतीची काळजी; 18 वर्षांपासून निक जोनास देतोय `या` आजाराशी झुंज
प्रियांका आणि निक जोनास हे बॉलिवूड आणि हॉलिवूड इंडस्ट्रीचं लाडकं कपल आहे. नेहमीच हे कपलही चर्चेत असतं. दोघंही आपलं एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात.
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राला देसी गर्ल म्हणून ओळखलं जातं. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. प्रियांका आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर ती तिचे आणि तिच्या फॅमिलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असते. प्रियांका आणि निक जोनास हे बॉलिवूड आणि हॉलिवूड इंडस्ट्रीचं लाडकं कपल आहे. नेहमीच हे कपलही चर्चेत असतं. दोघंही आपलं एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. 'मिस वर्ल्ड'मधून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाचं कौशल्य सातासमुद्रापार पोहोचवलं आहे.
बॉलीवूडमध्ये यशस्वी इनिंग खेळल्यानंतर प्रियांका आता हॉलिवूडमध्येही चांगलं काम करत आहे. लग्नानंतर प्रियांका तिच्या कुटूंबासोबत अमेरिकेत राहते. मात्र अधून-मधून ती तिच्या कामानिमीत्त भारतात येत असते. या सगळ्या दरम्यान, तिच्या पतीने निक जोनासने मोठा खुलासा केला आहे. तो बऱ्याच दिवसांपासून टाइप 1 मधुमेहाशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत प्रियांका त्याची विशेष काळजी घेते. त्याच्या या वक्तव्यानंतर प्रियांकावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नुकतीच निक जोनासने aol.com ला मुलाखत दिली यावेळी बोलताना त्याच्या आरोग्याविषयी अनेक खुलासे केले. याचबरोबर प्रियांकाबद्दलही त्याने खूप खुलासे केले. जे ऐकल्यानंतर त्याचे चाहते प्रियांकावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यावेळी बोलताना निक म्हणाला की, आता तो प्लान करत आहे की, तो त्याच्या आजाराबद्दल त्याची मुलगी मालती मैरी चोपडा जोनासला त्याच्या या आजाराबद्दल सांगणार आहे. निकचं म्हणणं आहे की, जेव्हा सुरुवातीच्या दिवसांत मुलीसोबत खेळताना त्याची ब्लड शुगर कमी व्हायची. त्या दरम्यान त्याची मुलीला त्याचं अटेंशन किंवा बॉटल या कोणत्याही गोष्टीची गरज भासू लागायची. हा त्याचा एक वेगळा अनुभव होता. यानंतर त्याने ठरवलं की, तो आपल्या मुलीला आपल्या या आजाराबद्दल नक्कीच सांगणार की तिचे वडिल त्याच्या गरजा पुर्ण करण्यासाठी थोडा वेळ का लागतो.
निक जोनासने मुलाखतीत पुढे प्रियंकाचं खूप कौतुक केलं आणि सांगितलं की, जेव्हा-जेव्हा तो कॉन्सर्टला किंवा बाहेर जातो. तेव्हा तेव्हा प्रियंका नंबर्स एपद्वारे ती त्याचा ब्लड शुगर एक्सेस करते. अशावेळी जेव्हा त्याला त्याची शुगर हाईलेवल वाटते तेव्हा तो प्रियांकाला अलर्ट करतो. यावेळी तो असंही म्हणला की, प्रियांकाला फक्त त्याच्या डाईबिटीजशी घेवून अलर्ट नसते तर ती एक आई म्हणून सुद्धा कायम अलर्ट असते. नेहमीच ती सगळ्यांची ती खूप काळजी घेते.