प्रियंका चोप्राचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज; व्हिडिओ शेअर करत म्हणाली...
प्रियंका चोप्रा जोनस सध्या तिच्या `अनफिनिश्ड` पुस्तकामुळे तुफान चर्चेत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि लेखक प्रियंका चोप्रा जोनस सध्या तिच्या 'अनफिनिश्ड' पुस्तकामुळे तुफान चर्चेत आहे. प्रियंकाने या पुस्तकामध्ये तिच्या आयुष्यात आलेले अनेक चांगले-वाईट अनुभव मांडले आहेत. प्रियंकाच्या 'अनफिनिश्ड' पुस्तकात तुम्हाला प्रियंकाच्या लहानपणापासून ते अभिनय क्षेत्रापर्यंतच्या प्रवासाबद्दल माहिती वाचायला मिळणार आहे. जागतीक व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणारी सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम तिच्या आयुष्यातील मोठ्या घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.,
दरम्यान, प्रियंकाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला. तिच्या या व्हिडिओमुळे असा अंदाज बांधण्यात येत आहे की, ती लवकरच तिच्या चाहत्यांना काहीतरी मोठं सरप्राईझ देणार आहे. व्हिडिओमध्ये प्रियंका एका कागदावर लिहित आहे की, 'अभी बाकी है सफर...' असं म्हणत लवकरच येत आहे... असं देखील लिहिलं आहे.
त्यामुळे आता प्रियंका काय भेट देणार या प्रतिक्षेत चाहते आहेत. मीडिया रिपोर्टनुसार प्रियंकाच्या 'अनफिनिश्ड' पुस्तक लवकरच हिंदी भाषेतून येणार आहे. या पुस्तकाचं हिंदी नाव कदाचित 'अभी बाकी है सफर!' असं असू शकतं. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकाने आपल्या पुस्तकात एका घटनेचा उल्लेख केला आहे. 'जेव्हा प्रियंका एका दिग्दर्शकाला भेटली होती तेव्हा थोड्या गप्पा झाल्यानंतर त्याने प्रियंकाला उभं राहून गोल फिरायला सांगितलं. प्रियंकाने तसं केलंही. खूप वेळ दिग्दर्शक प्रियंकाला टक लावून पाहत होते. एकटक पाहत त्यांनी प्रियंका ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता.' असे अनेक प्रसंग प्रियंकाने या पुस्तकात मांडले आहेत.