लग्नाला वर्ष उलटल्यानंतर प्रियांका-निकनं एकमेकांबद्दल असं प्रेम केलं व्यक्त
कोणताही कार्यक्रम असो या दोघांच्या उपस्थितीची चर्चा चांगलीच रंगत असते
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनस गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होते. कोणताही कार्यक्रम असो या दोघांच्या उपस्थितीची चर्चा चांगलीच रंगत असते. पण आता जी चर्चा चर्चा रंगत आहे त्यामधून त्यांचे एकमेंकांवर असलेलं प्रेम व्यक्त होत आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या देखील पसंतील पडत आहे.
प्रियांका आणि निक कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते दोघे एकमेकांना किस करताना दिसत आहेत. त्यानंतर प्रियांका निकच्या ओठांवरून लिपस्टिकचे डाग पुसताना दिसत आहे.
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसला जोड होती ती म्हणजे सुंदर हिऱ्यांच्या गळातल्याची तर काळ्या रंगाच्या कोटमध्ये निकचा लूक फार उठावदार वाटतं होता. पुरस्कार सोहळ्यात जमलेल्यांच्या नजरा या प्रेमीयुगूलांवर खिळल्या होत्या.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी नववर्षाच्या दिवशी देखील दोघांचा एक रोमान्टिक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, प्रियंका नुकतीच 'स्काय इज पिंक'मध्ये दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि झायरा वसीमही होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. तर निक नुकताच 'जुमानजी'मध्ये दिसला होता. त्याशिवाय तो सध्या आपल्या स्टेज परफॉर्मन्समध्ये व्यग्र आहे.