Priyanka Chopra: ``त्याला माझे अंडरगारमेंट पाहायचे होते``, प्रियांकाचा दिग्दर्शकाबद्दल धक्कादायक खुलासा
Priyanka Chopra Latest News : प्रियांका चोप्रा सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या एका धक्कादायक विधानामुळे तुम्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
Priyanka Chopra Latest News : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलिवूड असो किंवा हॉलीवूड तिच्या बोल्डलूक आणि अभिनयामुळे काय चर्चेत असते. अभिनेत्रीने कॅलिफोर्नियातील एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
प्रियांकाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दुसरीकडे ती अनेक वेळा तिच्या वैयक्तित आयुष्याबद्दल खुलासे करत असते. देसी गर्लच्या एका धक्कादायक खुलासामुळे सिनेसृष्टी हादरली आहे.
खरं तर काही मीडिया रिपोर्टनुसार प्रियांकाने एका दिग्दर्शकाच्या कृतीबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. या दिग्दर्शकाच्या कृतीमुळे प्रियांकाला चित्रपट सोडण्याची वेळ आली होती. प्रियांकाने तिच्या बॉलीवूडमधील प्रवासाबद्दल सांगणाता हा गौप्यस्फोट केला आहे.
एका रिपोर्टनुसार जेव्हा प्रियांका सिनेसृष्टीत आपलं भविष्य आजमावत होती, त्यावेळची ही गोष्ट आहे. तेव्हा एका दिग्दर्शकाने तिला सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी तिच्यासोबत अश्लील वक्तव्य केलं. प्रियांका म्हणाली की, दिग्दर्शकाच्या त्या कृत्यामुळे त्याला चित्रपट सोडावं लागला होता. (Priyanka Chopra Makes BIG Claim Against Bollywood Directorhe said i need to see her Undergarment Latest entertainment news)
या अपमानस्पद घटनेबद्दल पुढे प्रियांका म्हणाली की, एका स्ट्रिपिंग सीनच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाला तिचे 'अंडरगारमेंट' पाहायचे होते. या चित्रपटात प्रियांका एका गुप्तहेराची भूमिका साकारणार होती. ''ही घटना कदाचित 2002 किंवा 2003 असेल... मी गुप्तहेर असते. त्यामुळे मी एका व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकण्याचा प्रयत्न करत असते. आता मी गुप्तहेर आहे तर सहसा मुली अशाप्रकारेच आपलं काम करतात. मी त्याला व्यक्तीला आपल्या प्रेम जाळ्यात अडकवत असताना मला कपडे काढावे लागणार होते. त्यानंतर मला चादरीने स्वतःला झाकायचं होतं. पण चित्रपट दिग्दर्शक बोला की, मला तुझे अंतर्वस्त्र बघायचे आहेत. नाहीतर हा चित्रपट बघायला कोणी कशाला येईल?''
प्रियांकासाठी हे सगळं खूप धक्कादायक होतं. ती पुढे म्हणाली की, ''त्याने मला हे थेट सांगितलं नाही. त्याने हे माझ्या समोरच्या स्टायलिस्टला म्हटलं. तो माझ्यासाठी अपमानास्पद क्षण होता.'' ''त्यावेळी माझ्या मनात आलं की, माझा कसा वापर करता येईल हेच पाहत आहे, मी काहीच नाही. माझ्यातील टँलेंटला महत्त्व नाही. मी काय योगदान देतेय हे महत्वाचं नाही. दोन दिवसांनी मी चित्रपट सोडला. त्या दिग्दर्शकाला मी रोज माझ्या डोळ्यासमोर पाहू शकत नव्हते.''
प्रियांकाने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं होतं की, इंडस्ट्रीतील लोकांनी तिला एका कोपऱ्यात ढकललं होतं. त्यानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. इथल्या राजकारणाला कंटाळाल्या असल्याचा गौप्यस्फोट तिने केला होता. त्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. तिने त्या चित्रपट आणि दिदर्ग्शकाचा नाव मात्र सांगितलं नाही.