मुंबई : बांगलादेशमधल्या रोहिंग्या शरणार्थींच्या छावणीला बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रानं भेट दिली होती. कॉक्स बाझार इथल्या या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केले. मात्र यावरून आता तिचं ट्रोलिंग सुरू झालं आहे. प्रियांका चोप्रा  बांग्लादेशच्या कॉक्स बाजारात गेली तेव्हा रोहिंग्यांच्या छावणीला तिनं भेट  दिली होती. तिथल्या मुलांबरोबर फोटो काढले आणि ते फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर अपलोडही केले आहेत.  त्यानंतर प्रियांका चोप्रावर टीका होतेय... ट्विटरवर प्रियांकाला ट्रोलिंग सुरू झालं आहे. प्रियांकानं रोहिंग्या मुस्लिमांना भेटायला जायला नको होतं, रोहिंग्या मुस्लीम या देशात राहू शकत नाहीत, ज्यांना त्यांच्याबद्दल कळवळा आहे, त्यांनीही या देशात राहू नये, अशी टीका भाजप खासदार विनय कटियार यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर प्रियांका काश्मीरमधल्या विस्थापित पंडितांना भेटायला का गेली नाही, आपल्या देशातली गरीब मुली दिसत नाहीत का, असे सवाल करत सोशल मीडियावर प्रियांका ट्रोल होऊ लागलीय आहे. काही जणांनी प्रियांकाचा हा पब्लिसिटी स्टंट आणि फॉलोअर्स वाढवण्याचा आटापिटा म्हटत टीका केली आहे. प्रियांका संयुक्त राष्ट्रांच्या बालअधिकारांसंदर्भातली सदिच्छादूत आहे. त्याअंतर्गतच ती बांग्लादेशमधल्या रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीत गेली होती. प्रियांका ट्रोल होण्याचं प्रमुख कारण म्हणजे म्यानमारमधल्या रोहिंग्या दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा जगासमोर उघड झाला आहे. रोहिंग्या दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात हिंदूचं शिरकाण केलं आहे.


२०१७ मध्ये १०५ हिंदूंची कत्तल केल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनलने उघड केलंय. त्यामुळे देशात रोहिंग्या मुस्लीमांविरोधात संतापाची लाट आहे. त्याचाच परिणाम म्हणून प्रियांकाला ट्रोल केलं जातंय.