प्रियांकाच्या आईने केला गौप्यस्फोट, `नीरव मोदी काम आणि वागणुकीत वेगळा`
देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाला. पण नीरवचे सेलिब्रेटी कनेक्शनही समोर आले.
मुंबई : देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाला. पण नीरवचे सेलिब्रेटी कनेक्शनही समोर आले.
नीरव मोदीच्या हि-याच्या कंपनीची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर राहिलेल्या प्रियांका चोप्राची फसवणूक झाली. दरम्यान प्रियंकाच्या आईने नीरवबद्दल धक्कादायक वक्तव्य केलंय.
काय केले प्रियांकासोबत?
प्रियांकाच्या मॅनेसजमेंट टीमने आरोप केलाय की, नीरवने त्याच्या जाहीरातींसाठी जितके पैसे देण्याचे कबूल केले होते, तितके पैसे दिले नाही.
हि-यांच्या या जाहीरातींमध्ये प्रियंका चोप्रासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा सुद्धा दिसला होता.
नीरव मोदीचे २ चेहरे
नीरव मोदी जसा दिसतो तसा नाही, आपलं काम आणि वागणुकीत पूर्णपणे वेगळा असल्याचे प्रियंकाची आई मधु चोप्राने सांगितलं.
मला स्वत:लाच समजत नाही की आम्ही अशाप्रकारच्या माणसांशी कसे जोडलो गेलो ? असा सवालही तिने केला.
माझ्या मुलीने नीरवच्या कंपनीसोबतचे सर्व करार रद्द केलेयत. आता आम्ही त्याच्याविरुद्ध नक्कीच कारवाई करु असेही मधु चोप्रा यांनी सांगितले.
मोठा घोटाळा
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकच्या मुंबईच्या शाखेतील १० हजार कोटींचा घोटाळा उघड झाला आहे.
ही रक्कम मुंबईतील एका शाखेतून घोळ करून अनधिकृतपणे देवाण-घेवाण करण्यात आल्याचे बोलले जात आहे.