मुंबई : 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा अखेर लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. तिचे लग्न ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, प्रियंकाने गुपचूप साखरपुडा केल्याचे वृत्त हाती आलेय. लंडन येथे प्रियंकाने तिचा मित्र निक जोनासबरोबर साखरपुडा केल्याचे अमेरिकन मीडियाने दिलेय. या दोघांनी आठवडाभरापूर्वीच लंडन गुपचूप साखरपुडा उरकून घेतला. प्रियंकाच्या वाढदिवशीच साखरपुडा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


प्रियंका ही सध्या हॉलिवूडमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, ती पुन्हा बॉलिवूडमध्ये सक्रीय होण्याचे वृत आले होते. प्रियंका दिग्दर्शक अली अब्बास जाफर याच्या 'भारत' सिनेमातून ती कमबॅक करण्याच्या तयारीत होती. मात्र, तिने तडकाफडकी हा सिनेमा सोडून दिला. आपण एका महत्वाच्या कामासाठी हा सिनेमा करणार नाही, असे सांगत तिने 'भारत' सिनेमाला नकार दिला होता. दरम्यान, प्रियंका ही बोहल्यावर चढणार असल्याने या सिनेमाला नकार दिल्याचे आता पुढे येत आहे. प्रियंका ऑक्टोबर महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय.



दरम्यान, दिग्दर्शक अली अब्बास याने सूचक ट्विट करुन प्रियंकाने साखरपुडा केल्याच्या वृत्ताला एक प्रकारे दुजोरा दिलाय. प्रियांकाने 'भारत' सिनेमा सोडल्याचे अली अब्बास यांने जाहीर केले आहे. 'एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विशेष कारणासाठी तिने हा निर्णय घेतलाय. ऐन वेळी तिनं आम्हाला हे सांगितले. मात्र, आम्हाला आनंद आहे. आमच्या संपूर्ण टीमकडून तिला शुभेच्छा,' असेही अब्बासने या ट्विटमध्ये नमूद केलेय.



अमेरिकन मीडियाच्या वृत्तानुसार प्रियंकासोबतच्या साखरपुड्यासाठी निकने न्यूयॉर्कमध्ये अंगठी खरेदी केली होती. साखरपुड्यानंतर निक आणि  प्रियंका दोघेही खूश आहेत.