Jonas Brothers Concert : न्यू यॉर्कमधील यांकी स्टेडियमवर रंगलेला जोनस ब्रदर्सचा कॉनसर्ट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या कॉनसर्टला निकची पत्नी आणि बॉलीवडू अभिनेत्री प्रियांका आवर्जून हजेरी लावते. शनिवारी झालेल्या या कॉन्सर्टमध्ये  एका महिलेचं धक्कादायक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. तिने प्रियांकासमोरच स्टेजवर असलेल्या निकवर आपली ब्रा फेकली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यानंतर प्रियांकाचा रडतानाचा एक व्हिडीओ समोर आला. या कॉनसर्टमध्ये निकने त्याचं पहिलं गाण सुरु केलं आणि प्रियांका इमोन्शल झाली. हा व्हिडीओ ही सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये होता.  


प्रियांकाचा पतीसोबत तो व्हिडीओ व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच कॉनसर्टमधील प्रियांका आणि निकचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे. या व्हिडीओमध्ये लाइव्ह कॉनसर्टच्या दरम्यान प्रियांका आणि निक बॅकस्टेज रोमान्स करताना दिसून आले. या व्हिडीओमध्ये निक आणि प्रियांका एकमेकांना किस करताना आणि मिठी मारताना दिसत आहे.  (priyanka chopra nick jonas kiss hugs jonas brothers concert yankee stadium video viral on Social media)


एका फॅन पेजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, प्रियांका चोप्रा न्यूयॉर्कमधील यांकी स्टेडियममध्ये जोनास ब्रदर्सच्या डे-टू शोमध्ये गाताना आणि आनंद लुटताना दिसली. प्रियांकाही निकच्या भावाचा परफॉर्मन्स सुरु असताना बॅकस्टेजवर गेली. त्यावेळी त्यांच्यामधील रोमान्सचा क्षण एका चाहत्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.  



प्रियांका आणि निक कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर प्रियांका त्यांचे अनेक रोमाँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. टेनिस मॅचच्या वेळीही त्या दोघांमधील रोमान्स दिसून आला होता.



हे प्रेमी युगुल कधीही कुठेही बिनधास्त रोमान्स करताना दिसतात.