मुंबई : बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री आपल्या अभिनयाने हॉलिवूडमध्ये आपली छाप सोडत आहे. सोशल मीडियावर वर्चस्व गाजवणाऱ्या प्रियंका चोप्राचा एक जुना फोटो सोशल मीडियीवर खूप व्हायरल होत आहे. फोटो पाहिल्यानंतर लोक प्रियंका चोप्राला ट्रोलही करत आहेत. प्रियांका चोप्राचा हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल एवढं नक्की.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकाचा फोटो होतोय व्हायरल 
खरं तर, प्रियांका चोप्राचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे.  ज्यात ती एका पुरस्कार सोहळ्याला येताना दिसत आहे. प्रियांकाने ब्लॅक बॉडीकॉन स्टाईलचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यात एका बाजूने उंच कट आहेत. तसंच या ड्रेसला शिमरी नेट बसवलं आहे. प्रियांकाचा हा ड्रेस बऱ्यापैकी  रिवीलिंग आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल . या फोटोत तिच्यासोबत घडलेल्या वार्डरोब मालफंक्शनमुळे प्रियांका ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे. 


प्रियांकाने कॉन्फिडंन्सने कॅरी केला ड्रेस 
प्रियंका चोप्राने तिचा बोल्ड ड्रेस मोठ्या कॉन्फिडंन्सने कॅरी केला आहे. तिने पापाराझींसमोर स्टायलिश पोजही दिल्या. तिच्या बॉडीचा उघडलेला भाग तिने हातांनी लपवण्याचाही प्रयत्न केला, पण असं करताना तिचे फोटो कॅमेऱ्यात कैद झाले.  प्रियांकासोबत असं घडण्याची ही काही पहिली वेळ नाही. तिने यापूर्वी अनेकवेळा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. तिच्या सुपर बोल्ड आउटफिटमुळे तिला अनेकवेळा ट्रोल केलं गेलं आहे. प्रियंका चोप्रा तिच्या अनोख्या शैलीसाठी ओळखली जाते.



प्रियंकाचं वर्कफ्रंट
'सिटाडेल' आणि 'मॅट्रिक्स 4' व्यतिरिक्त, प्रियांकाचे इतर अनेक हॉलीवूड प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत. याशिवाय ती फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या हिंदी चित्रपटातही दिसणार आहे. यामध्ये ती प्रथमच आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.