नवी दिल्ली : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपल्या कामामुळे आणि तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियंकाने पुन्हा एकदा तिच्या खास विधानामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपली प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ खूप चांगल्या प्रकारे हाताळणारी प्रियंकाने तिच्या वैयक्तिय आयुष्यातील प्रश्नांची अगदी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. 


काय म्हणाली प्रियंका?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी प्रियंकाने तिच्या अफेअर्सच्या चर्चांबद्दल मौन पाळणे पसंत केले. मात्र एका इंटरनॅशनल मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. ती जे म्हणाली ते ऐकून तुम्हाला काहीसे आर्श्चय आणि गंमत वाटेल. प्रियंका म्हणाली की, तिला खूप सारी मुले हवी आहेत पण कोणापासून ते माहित नाही.


लग्न आणि कुटुंबसंस्थेवर पूर्ण विश्वास


प्रियंका खूप काळापासून सिंगल आहे. त्यामुळे आता मी लग्नाचा फार गांर्भीयाने विचार करत आहे आणि मला कुटुंबसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्याचबरोबर मी हे प्रसिद्धीसाठी बोलत नसून मनापासून बोलत आहे, असे स्पष्टीकरणही प्रियंकाने दिले.


यामुळे होईल प्रियंका इंप्रेस


तिचे मन जिंकण्यासाठी तिच्या पार्टनरला केअरिंग आणि स्मार्ट असणे गरजेचे आहे. अन्यथा मेळ होऊ शकणार नाही, असे तिने सांगितले. त्याचबरोबर तो खूप भावूक आणि रोमांटीक असणे प्रियंकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 
त्याचबरोबर प्रियंका लग्न आणि मुलांबद्दलही बोलली, सध्या लग्न आणि मुलं हे तिचे लक्ष्य आहे. मात्र ते कोणासोबत होईल हे तिला माहित नाही.