Priyanka Chopra Called Black Cat : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. आज प्रियांका एक ग्लोबल स्टार असली तरी सुरुवातीच्या काळात तिला चित्रपटसृष्टीत वाईट वागणूक मिळाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकानं सुरुवातीच्या काळाता तिला आलेल्या रंगाच्या भेदभावाचा सामना केल्याचा खुलासा केला आहे. 


पाहा काय म्हणाली प्रियांका चोप्रा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीबीसीच्या ‘100 यशस्वी महिलांच्या ‘ यादीत चार भारतीय महिलांपैकी एक नाव प्रियांकाचं आहे. प्रियांकाने ही 2022 मधील प्रभावशाली महिलांपैकी एक आहे. या निमित्तानं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वर्ण भेदा विषयी सांगितलं. 'मला काळी मांजर आणि सावळी म्हणायचे. मला या शब्दाचा अर्थ कधीच समजला नाही कारण आपल्या देशातील प्रत्येकाच्या स्कीनचा रंग हा तसाच आहे. मी सुंदर नसल्यानं मला खूप मेहनत घ्यावी लागेल असं मला वाटायचं. ज्या अभिनेत्रींची त्वचा थोडी उजळ आहे त्यांच्यापेक्षा अभिनयात मी नक्कीच जास्त टॅलेन्टेड आहे, पण वर्णभेद हा इतका सर्रास होता की मला वाटायचे की हे सगळं ठीक आहे, कारण याला नॉर्मल म्हणायचे.'



प्रियांका पुढे म्हणाली, 'साहजिकच आपल्या देशाचा जो भूतकाळ आहे तो या सगळ्याला कारणीभूत आहे. ब्रिटिश राजवटीला भारतातून जाऊन आजही शंभर वर्षे पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मला वाटतं की आपण अजूनही त्या गोष्टीला जोडून आहोत. पण आता हे सगळं आपल्या पिढीवर अवलंबून आहे. आपल्यात या गोष्टी बदलण्याची क्षमता आहे जेणेकरुन येणारी पिढी ही फक्त उजळ रंगाला चांगलं मानणार नाहीत. (priyanka chopra reveals being called black cat and dusky colourism in bollywood) 


हेही वाचा : Ram Gopal Varma ने ओलांडल्या सर्व मर्यादा; अभिनेत्रीचे पाय पकडून Kiss


दरम्यान, रुसो ब्रदर्स यांच्या आगामी साय-फाय सिरिज ‘सीटाडेल’मध्ये प्रियांका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच प्रियांका फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रियांकाबरोबर आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.