प्रियांकाला आई होण्याचा आनंद मिळाला, पण या गोष्टीचा त्याग करावा लागला
ग्लोबल स्टार बनलेली प्रियांका चोप्रा आता आई बनली आहे.
मुंबई : ग्लोबल स्टार बनलेली प्रियांका चोप्रा आता आई बनली आहे. आता कामापेक्षा नक्कीच तिला आणि निकला मुलासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडेल. त्यामुऴे प्रियांकाचा आपल्या बाळासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागला आहे, तिने आपल्या मुलासाठी मोठा निर्णय आता घेतला आहे. असाच काहीसा निर्णय तिला निकसोबत लग्न करताना देखील घ्यावा लागला होता.
करिअरच्या शिखरावर असलेल्या प्रियांका चोप्राने मुलासाठी चित्रपटांतून ब्रेक घेत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
प्रियांकाने जी ले जरा या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचं बोललं जात आहे. अभिनेत्रीला तिचा वेळ पहिल्या मुलाला द्यायचा आहे. आता या वृत्तांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रियांका आणि निर्मात्यांकडून कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.
पण या वादामुळे जुन्या आठवणी नक्कीच जाग्या झाल्या आहेत. प्रियांका चोप्राचे लग्न झाले नव्हते तेव्हाही अशाच प्रकारची चर्चा झाली होती.
निकसोबत लग्न करण्यापूर्वी प्रियांकाने सलमान खानचा भारत हा चित्रपट साईन केला होता. दोन्ही कलाकार एकमेकांसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक होते. प्रियांका चोप्राने सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाला सुरुवात करण्यापूर्वीच नकार दिला. लग्नासाठी प्रियांकाने चित्रपट सोडला.
प्रियांकाने निक जोनाससोबत लग्न केल्याने सलमान खानला राग आला. प्रियांकाने आधी लग्नासाठी आणि आता मुलासाठी चित्रपट सोडणे हे दाखवते की तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी नातेसंबंध करिअरपेक्षा महत्त्वाचे आहेत. तसे, प्रियांकाने पहिल्यांदाच चित्रपट नाकारला असे नाही. याआधीही तिने चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या.