मुंबई : प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या घरात एक आनंदाची बातमी आहे. प्रियंकाच्या दिराची पत्नी म्हणजे जो जोनसची पत्नी सोफी टर्नरने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. पीपलने दिलेल्या माहितीनुसार गेम ऑफ थ्रोनची अभिनेत्री सोफी टर्नर आणि जो जोनसने आपल्या गोंडस मुलीचं नाव विला (Willa) असं ठेवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोफीने २२ जुलै रोजी लॉस एंजिलिसच्या एका हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला आहे. लहान मुलीच्या आगमनामुळे हे दाम्पत्य आणि कुटुंब अतिशय आनंदात आहे. सोफी टर्नरचे अनेक फोटो गरोदरपणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्या फोटोंत ती बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 



यावर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात सोफी गरोदर असल्याचं कळलं. चाहत्यांना त्यांनी फेब्रुवारी महिन्यात माहिती दिली. ज्यानंतर कुटुंब आणि चाहते या बाळाच्या आगमनाची तयारी करत होते. सोफी आता २४ वर्षांची आहे. 


 



२०१६ मध्ये सोफी आणि जो यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. सोफी आणि प्रियंका यांच्यामध्येही अतिशय चांगल नां आहे. दोघी सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. कुटुंब एकमेकांसोबत अनेकदा फोटो शेअर करत असतात. सोफी प्रियंकापेक्षा १४ वर्षांनी लहान आहे.