या कारणामुळे प्रियांका चोप्रा पुन्हा झाली ट्रोल
१५ ऑगस्टला भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियांका चोप्राने खास व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता.
मुंबई : १५ ऑगस्टला भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियांका चोप्राने खास व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता.
पण त्यावर सोशल मिडियातून काही नकारात्मक कमेंट्स येत आहेत.
अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिरंग्याचे तीन रंग असलेल्या एक ओढनी घेऊन फोटो ट्विटरवर शेअर केला. तसाच एक व्हिडिओदेखील इंन्स्टाग्रामवर टाकला होता. पण तिचा हा स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्याचा पर्याय काहींना रूचला नाही. त्यांनी ट्रोल करायला सुरवात केली आहे.
तिरंगा ओढणीचा असा वापर करणं चूकीचं आणि अपमानकारक आहे. असे काहींनी तिला सुनावले. तर काहींनी तिला भारतात पुन्हा येऊ नकोस असा सल्लाही दिला.
सद्ध्या प्रियांका काही प्रोजेक्ट भारतात आणि काही प्रोजेक्ट हॉलिवूडमध्ये अशा दोन्ही ठिकाणी काम करत आहे. यापूर्वीही नरेंद्र मोदींची भेट घेताना प्रियांकाने घातलेल्या कपड्यांवरून सोशल मिडियामध्ये ती ट्रोल झाली होती.