मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचे नाव भारतीय दिग्गजांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.  मॅडम तुसाद संग्रहालय येथे प्रियंका चोप्राचा  मेणचा पुतळा उभारण्यात आला आहे. प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आणि सांगितले की लंडन, सिडनी आणि आशियासह जगभरातल्या 6 इतर शहरांमध्ये तिचा  मेणचा पुतळा उभारण्यात येणार आहे. तिने फेसबुकवर लिहले, 'अखेरीस शक्य झाले आता तुम्ही न्यूयॉर्क शहरातील मॅडम तुसाद येथे माझी मेण प्रतिमा पाहू शकता'




 
‘क्वांटिको'  अभिनेत्री प्रियंका चोप्राने एक व्हिडिओ सुद्धा इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रियंका मॅडम तुसादच्या कलाकारांसोबत काम करताना दिसत आहे. प्रियंकाच्या पुतळ्याला जेसन वु चा लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. हा ड्रेस तिने २०१६ च्या एमी अवार्ड सोहळ्यात घातला होता. पती निकने दिलेल्या आंगठीची नकल सुद्धा करण्यात आली आहे. प्रियंका सध्या हॉलिवूड सिनेमा “इजंट इट रोमांटिक?”च्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.