मुंबई : प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि जेव्हा ती सक्रिय नसते तेव्हा तिचे फोटो आणि व्हिडिओ तिचे  चाहते सोशल मीडियावर शेअर करु लागतात. आणि ते व्हायरल होवू लागतात. अलीकडेच, प्रियांकाचा एक फोटो जंगलात आगीसारखा पसरत आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की, तिचा हा फोटो जंगलात काढण्यात आला आहे. या फोटोत अभिनेत्रीची अवस्था वाईट दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो व्हायरल होत आहे
प्रियंका चोप्राने नुकतंच 'सिटाडेल'चं शूटिंग पूर्ण केलं आणि या चित्रपटाच्या टीम मेंबरने अभिनेत्रीचा असा फोटो शेअर केला की, आता तो लगेच व्हायरल झालाय. प्रियांकाचा हा फोटो मायकल वुडने क्लिक केला होता आणि नंतर त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोवर अभिनेत्रीने कमेंटही केली आहे. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद.  असं तिने आपल्या कमेंटमध्ये लिहिलं आहे. 



प्रियांका चाहत्यांसाठी वेळात-वेळ काढते
बॉलीवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपली छाप सोडणारी प्रियांका चोप्रा करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. प्रियांका तिच्या कामात कितीही व्यस्त असली तरी ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेळात-वेळ काढते आणि तिच्या सोशल मीडिया हँडलद्वारे त्यांच्याशी जोडलेली राहते.