मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही अमेरिका नेटवर्क 'एबीसी'साठी एका विनोदी मालिकेची निर्माती करणार आहे. विशेष म्हणजे, ही मालिका बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या जीवनावर आधारीत असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका चोप्रा हिने हॉलीवूडमध्ये आपले स्थान निश्चित केलंय. 'वराइटी डॉट कॉम'नं दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेचं नाव काय असायला हवं? याबद्दल अजून चर्चा सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे, माधुरीही या  मालिकेची सह-निर्माती असणार आहे.


माधुरीचा 'ब्रेक' 


अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर चित्रपट सृष्टीतून ब्रेक घेतला. यानंतर त्या अमेरिकाच्या डेन्वर या शहरात आपल्या कुटुंबासोबत स्थायिक झाल्या. या मालिकेत माधुरी दीक्षित या कशाप्रकारे आपल्या दोन्ही कुटुंबामध्ये राहतात आणि आपल्या रंगीबेरंगी जीवनशैलीला कसं एका वेगळ्याच शहरात आणण्याचा प्रयत्न करते... त्याचा सगळा प्रवास आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.  


बॉलिवूडमध्ये 'कम बॅक'


माधुरी दीक्षित या चित्रपट सृष्टीतील सर्वांत आकर्षक अभिनेत्रींपैंकी एक अभिनेत्री... दोन मुलांची आई... जवळपास पाच वर्षांपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कम बॅक करण्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यातच माधुरी दीक्षित यांनी म्हटले की काहीतरी नवीन आणि उत्साहवर्धक होणार आहे... आणि त्याची घोषणाही केली जाईल.


अभिनेत्री प्रियंका चोप्रा एका अमेरिकन शो 'क्वांटिको'मध्ये काम करतेय. त्याचं तिसरं सीझन चालू आहे. या वर्षाची सुरूवात प्रियंकाने हॉलीवूड डेब्यू 'वेबॉच'नं केली आणि सध्या ती लियम हेम्सवर्थ बरोबर  'इजंट इट रोमँटिक' नावाच्या एका रोमँटिक विनोदी मालिकेच्या शुटींगमध्ये व्यक्त आहे.