नवी दिल्ली : प्रियंका चोप्रा केवळ बॉलिवूड अभिनेत्री नाही तर ग्लोबल एक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. शेकडो बॉलिवूड सिनेमांनंतर तिने आता हॉलीवूडमध्ये आपली खास छबी बनविली आहे. पण इथपर्यंत प्रियांकाचा प्रवास दिसतो तितका सोपा नक्कीच नव्हता.


आईने केला खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिस वर्ल्ड किताब जिंकल्यानंतर डायरेक्टरने अशी काही मागणी केली की ती पूर्ण करणे प्रियंकाला शक्य नव्हते. त्यामूळे तिला अनेक सिनेमा गमवावे लागले.  याचा खुलासा तिची आई मधु चोप्रा हिने नुकताच केला आहे.


'तसे' कपडे घाल


आई मधु चोप्रा हिने डेक्कन क्रोनिकलला दिलेल्या एका मुलाखतीत प्रिंयकाने गमावलेल्या १० सिनेमांमागचे गुपित सांगितले. करिअरच्या सुरुवातीला सिनेमा निर्मात्यांनी प्रियंकाला अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्याची अट ठेवत होते. यासाठी ती तयार नव्हती. 


तर काय फायदा ?


एका डिझायनरने प्रियांका सांगितले की, डायरेक्टरची इच्छा आहे की तु अंगप्रदर्शन करणारे कपडे घालावावेस. 'जी मिस वर्ल्ड कॅमेरासमोर स्वत:चे सौंदर्य दाखवू शकत नाही तिला सिनेमात घेऊन काय फायदा ?' असे डायरेक्टरचे म्हणणे होते. 


बाहेरचा रस्ता


प्रियकांला ही अट घालणारा डायरेक्टर हा फिल्म इंडस्ट्रीतील मोठी हस्ती होती. त्यामूळे त्याने त्याच्या १० सिनेमातून प्रियंकाला बाहेरचा रस्ता दाखविला होता. पण तेव्हा प्रियंकाने या गोष्टीची तमा बाळगली नव्हती.


हॉलीवूडमध्ये बिझी


प्रियंका सध्या अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटीको सीझन ३' सहित २ हॉलीवूड सिनेमांमध्ये काम करत आहे. तसेच आई मधू चोप्रा सोबतही काही रिजनल सिनेमांची तयारी करत आहे.