मुंबई : बॉलीवूडपाठोपाठ हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती अमेरिकन सिंगर निक जोनास याने नॅशनल डायबिटीज महिन्याच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.  ज्यामध्ये निकला लहान वयातच टाईप 1 डायबिटीज झाल्याचं उघड झालं आहे. त्याचा तो शिकार झाला असून गेल्या 16 वर्षांपासून तो या आजाराने त्रस्त आहे. निकने आपल्या पोस्टमध्ये लोकांना या आजाराच्या लक्षणांची माहिती दिली आहे. यासोबतच त्याने पत्नी प्रियांका चोप्राच्या स्पोर्टमुळे या आजारावर कशी मात केली हेही सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निक जोनासने अलीकडेच त्याच्या  इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निक जोनासने सांगितलं आहे की, तो 13 वर्षांचा होता जेव्हा त्याला कळलं की, त्याला डायबिटीज आहे आणि गेल्या 16 वर्षांपासून त्याला डायबिटीज आहे आणि तो यातून बरा होत आहे.


निकने लिहिलंय की, 'आज माझ्या आजाराला 16 वर्षे झाली आहेत. मी १३ वर्षांचा होतो आणि माझ्या भावांसोबत खेळत होतो आणि मला माहित होतं की, माझ्या पोटात काहीतरी गडबड आहे. म्हणून मी माझ्या आई-बाबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की, मला डॉक्टरांकडे घेवून चला.


माझी सगळी लक्षणं जाणून घेतल्यानंतर, बालरोग तज्ञांनी सांगितलं की, मला टाइप 1 डायबिटीज आहे. यानंतर मी खूप घाबरलो होतो. तेव्हा मला वाटलं की, मी बरबाद झालो. त्यावेळी मला असंही वाटलं की, माझं जग फिरायचं माझं संगीत क्षेत्रात काम करण्याचं स्वप्न तुटलं ?' पुढे, निकनं लिहिलं, 'पण मी स्वतःला वचन दिलं होतं की, मी स्वत:ला कधी स्लो करणार नाही.  माझा एक समर्थक होता, ज्याचा माझ्यावर विश्वास होता, ज्याने मला कधीच कमजोर होवू दिलं नाही.


निक जोनासच्या या पोस्टवर त्याचे वडील केविन जोनास आणि पत्नी प्रियांका चोप्रा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टवर कमेंट करत केविनने लिहिलंय की, 'आम्ही तो दिवस कधीच विसरणार नाही. तू आम्हा सगळ्यांना प्रेरणा देतोस, तुझ्यावर आम्ही खूप प्रेम करतो.'' त्याचबरोबर प्रियंका चोप्राने निकच्या या पोस्टवर इमोजी शेअर करत आपली प्रतिक्रीया दिली आहे.



निक जोनासने एका कार्यक्रमात सांगितलं की, त्याची पत्नी प्रियांका चोप्राने त्याला या आजाराशी लढण्यासाठी खूप मदत केली आहे. तो म्हणाला की माझ्यावर प्रेम करणारा, तुम्हाला मदत करणारा आणि प्रत्येक प्रकारे विचार करणारा जोडीदार तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. यासाठी मी प्रियांकाचा मनापासून आभारी आहे. 2018 मध्ये निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांनी जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाला लवकरच तीन वर्षे पूर्ण होणार आहेत.