प्रियांकाची आई म्हणाली, `पीएम भेटले तेव्हा शॉर्ट कपडे का घातले?`
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियांका चोपडा यांच्या या चर्चेवर आणखी जोरदार चर्चा सोशल मीडियावर नेटीझन्सने केली.
मुंबई : जर्मनीतील बर्लिनमध्ये मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूडची अभिनेत्री प्रियंका चोपडा यांची भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियांका चोपडा यांच्या या चर्चेवर आणखी जोरदार चर्चा सोशल मीडियावर नेटीझन्सने केली.
कारण प्रियांकाने ज्यावेळी पंतप्रधानांची बर्लिनमध्ये भेट घेतली तेव्हा प्रियांकाने शॉर्ट कपडे घातले होते. यावरून लोकांनी तिला खूप ट्रोल केलं, यानंतर याबाबतीत प्रियांकाच्या आईने एका मुलाखती दरम्यान यावर प्रतिक्रिया केली. प्रियांकाची आई मधू चोपडाने सांगितलं की, प्रियांकाने लहान ड्रेस का घातला होता.
प्रियांकाच्या आईने सांगितलं की, प्रियांका बेवॉचच्या प्रमोशनसाठी बर्लिनला पोहोचली, त्यावेळी तिला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली, अचानक भेट झाल्याने प्रियांकाला साडी नेसायला तेवढा वेळ मिळाली नाही.
प्रोटोकॉल अधिकाऱ्यांनीही प्रियांकाच्या ड्रेसमध्ये काहीही चुकीचं नसल्याचं सांगितलं, नंतर या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रियांकाच्या ड्रेसवर पंतप्रधानांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही, असं मधू चोप्रा यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं.