मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. प्रियंका दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. जगभरात तिचे करोडो चाहते आहेत. प्रियांका तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतचं तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्रियंका आणि निक विभक्त होणार अशी चर्चा रंगली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मात्र प्रियंकाने निकसोबत रोमांटिक फोटो पोस्ट करत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला प्रियंका चोप्राची मॅनेजर अंजुला आचार्यबद्दल सांगणार आहोत, जी हॉटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत देसी गर्लला पूर्ण टक्कर देतात.



प्रियांका चोप्राची मॅनेजर जी सतत तिच्यासोबत असते. ती देसी गर्लला प्रत्येक प्रकारे सपोर्ट करते. एवढंच नाही तर ती सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते.


प्रियांकाच्या मॅनेजरचं नाव अंजुला आचार्य आहे. अंजुला आचार्य देखील तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, जे लोकांना खूप आवडतात.



प्रियांका आणि अंजुला अनेकवेळा एकत्र दिसले, अंजुला प्रियंकासोबतचे फोटो इंटरनेटवर पोस्ट करत असते. अंजुला ड्रेसिंग सेन्स प्रियांकापेक्षाही भन्नाट आहे. अंजुला कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.