मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होत आहे. आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आज देखील न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान आर्यनच्या समर्थनासाठी संपूर्ण बॉलिवूड एकत्र आलं आहे. आता प्रसिद्ध दिग्दर्शक  प्रकाश झा, आर्यनच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. नुकताचं त्यांनी आर्यन खान ड्रग्स प्रकरणात मौन सोडलं आहे. आर्यन खानच्या समर्थनार्थ झा म्हणाले आर्यन मोठ्या अडचणीत सापडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत झा म्हणाले, 'मला या प्रकरणात अधिक माहिती नाही. प्रकरण नक्की कोणच्या दिशेने जात आहे. यामध्ये कोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत. पण एवढं नक्की सांगू शकतो स्टारकिड मोठ्या अडचणीत सापडला आहे. मला नाही माहिती यावर काय प्रतिक्रिया द्यायला हवी...'


पुढे झा म्हणाले, 'मला नाही माहिती याप्रकरणी लोक नक्की काय कमेन्ट करतील. मी पूर्ण प्रकरण वाचलं देखील नाही पण शाहरुख खानचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडला आहे... त्याला या अडणीतून बाहेर काढणं अधिक कठिण झालं आहे.' त्यामुळे ड्रग्स प्रकरणी आर्यनला कधी दिलासा मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला दिलासा नाहीच
क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला दिलासा नाहीच. आर्यन खानला आजही जामीन नामंजूर झाला नाही. मुंबई सेशन कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे. गेल्या 13 दिवसांपासून आर्यन खान आर्थर रोड जेलमध्येच आहे. मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट या दोघांचाही जामीन नामंजूर झाला आहे. यामुळे या तिघांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.