मुंबई : चित्रपट निर्माता अली अब्बास जफर हे  'टाइगर जिंदा है' या सलमानच्या चित्रपटाचे क्लायमॅक्स शूट करण्यासाठी काहीसे नर्व्हस आहेत. रविवारी केलेल्या ट्वीटमध्ये अली अब्बास जफर यांनी लिहिले की, "टाइगर जिंदा है चे शेवटचे २२ दिवस बाकी आहेत. उद्या क्लायमॅक्स शूटिंगसाठी हेव्ही ड्युटी करावी लागणार असून मी काहीसा नर्व्हस आणि उत्साहीत देखील आहे."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



२०१२ मध्ये आलेल्या ब्लॉकब्लास्टर 'एक था टाइगर' या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. यात अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची इच्छा आहे. या चित्रपटाचे शूटींग ऑस्ट्रिया आणि अबू दाबी येथील दर्शनीय स्थळांवर करण्यात आले आहे.