सलमान, शाहरुख आणि आमिर खानबद्दल बोनी कपूर यांचे वक्तव्य, म्हणाले `ते तिघेही...`
`अजय देवगण हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे`, असे वक्तव्य बोनी कपूर यांनी केले आहे.
Boney Kapoor Predictions : बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक म्हणून बॉनी कपूर यांना ओळखले जाते. त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘नो एन्ट्री’, ‘वॉन्टेड’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. सध्या बोनी कपूर हे त्यांच्या अनेक प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहेत. आता लवकरच बोनी कपूर यांची निर्मिती असलेला मैदान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता बोनी कपूर यांनी सिनेसृष्टीतील तिन्ही खानांबद्दल भविष्यवाणी वर्तवली आहे.
बोनी कपूर हे मैदान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्त बोनी कपूर यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोनी कपूर यांनी सिनेसृष्टीतील तिन्ही खानांबद्दल एक भविष्यवाणी केली आहे. याचदरम्यान बोनी कपूर यांनी अजय देवगणबद्दलही एक वक्तव्य केले आहे. बोनी कपूर यांनी शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानच्या स्टारडमचे कौतुक केले. बॉलिवूडमध्ये असलेले तीन खान म्हणजेच शाहरुख, सलमान आणि आमिर खान हे तिघेही अनेक दशकांपर्यंत स्टार राहतील, असे बोनी कपूर म्हणाले.
अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक
यावेळी बोनी कपूर यांनी अजय देवगणच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले. अजय देवगण हा फार सहजरितीने एखादी व्यक्तिरेखा साकारतो. अजय देवगण हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत. तो एखादे पात्र किंवा व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत करतो. अजय हा एक असा व्यक्ती आहे जो पुढील अनेक दशकं अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे स्टार बनून राहिल, असे बोनी कपूर म्हणाले.
दरम्यान अजय देवगणचा बहुप्रतिक्षित ‘मैदान’ हा चित्रपट येत्या 10 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक बायोग्राफीकल स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. भारतीय फुटबॉल संघाच्या सुवर्णकाळावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगण हा फुटबॉल प्रशिक्षक सैयद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारणार आहे. ‘मैदान’ या चित्रपटात अजय देवगणसह प्रियामणी, नितांशी गोयल, अमीर अली शेख, आर्यन भौमिक, अमर्त्य रे, मधुर मित्तल असे बरेच कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची अक्षय कुमार व टायगर श्रॉफच्या ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटासोबत टक्कर होणार आहे.