पुणे : एफटीआयआयचा पदभार नवे चेअरमन अनुपम खेर यांनी स्विकारला आहे. आजे ते एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आले होते. अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांशी गप्पाही मारल्या आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एरवी शांत असलेल्या एफटीआयआयमध्ये दुपारी एकच्या सुमाराला अनुपम खेर यांची अचानक एंट्री झाली. गेटपासूनच त्यांनी चालत सुरवात केली. आल्या आल्या त्यांनी एका वर्गात प्रवेश करून क्लासही घेतला. चालतच त्यांनी एफटीआयआयच्या विविध विभागांना भेट दिली. विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. 
 
अनुपम खेर यांनी थेट मेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांबरोबर जेवणही केलं. अगदी रांगेत उभं राहून त्यांनी जेवण घेतलं. मंगळवारी आपण सर्व विद्यार्थ्यांचा मास्टर क्लास घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनीही त्यांचं स्वागत केलंय. 



अनुपम खेर म्हणाले की, ‘आज मी खूप आनंदी आहे. मी ४० वर्षांआधी इथे विद्यार्थी म्हणून आलो होतो. आज पुन्हा आलोय. मी सर्वात आधी विद्यार्थ्यांना भेटलो. आमच्यात चांगलं बोलणं झालं. आज मी पहिला क्लास घेतला. ज्यात मी अभिनयावर बोललो’.
 



एफटीआयआयचे माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांचा अनुभव पाहता अनुपम खेर यांची एफटीआयआयमधील पहिली एंट्री सुखद होती. त्यामागे अनुपम खेर यांचा अभिनयातील दांडगा अनुभव आणि गुणवत्ता हे कारण आहेच. आता सुरूवात तर चांगली झालीय. त्याचप्रमाणे अनुपम खेर आणि विद्यार्थी यांचा पुढचा प्रवासही एकत्रित आणि चांगला व्हावा याच अपेक्षा.
 
नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे