हसत हसत शेवटचे क्षण जगला पुनीत राजकुमार... शेवटच्या काही तासांचा व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ काढला गेला तेव्हा कोणीही असा विचार केला नसावा की, हा हसता खेळता चेहरा असा अचानक काळाच्या पडद्याआड जाईल.
मुंबई : साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) याचं शुक्रवारी म्हणजे आज दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या ४६ व्या वर्षी पुनीतने (पुनीत राजकुमार) या जगाचा निरोप घेतला. अभिनेत्याच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सोनू सूद आणि वीरेंद्र सेहवागसह सर्व सेलिब्रिटींनी ट्विट करून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
पुनीतची शेवटचा कार्यक्रम
पुनीतच्या निधनानंतर त्याचे करोडो चाहते आणि हितचिंतक यांना धक्का बसला आहे. सध्या पुनीतच्या चाहत्यांकडून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुनीतच्या मृत्यूच्या काही तास आधीचा आहे.
या व्हिडीओमध्ये पुनीत (Puneeth Rajkumar) सुपरस्टार यशसोबत डान्स करताना दिसत आहे. KGF स्टार यश आणि पुनीत राजकुमार यांचा एकत्र असलेला हा शेवटचा व्हिडीओ होता.
पुनीतचा हा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदारपणे शेअर केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ काल रात्रीच्या 'बजरंगी 2'च्या प्रमोशन इव्हेंटचा आहे. या कार्यक्रमात पुनीत राजकुमार 'KGF-2' स्टार यशसोबत स्टेजवर मस्ती करताना आणि नाचताना दिसत आहे. (Puneeth Rajkumar)
काल जेव्हा हा व्हिडीओ काढला गेला तेव्हा कोणीही असा विचार केला नसावा की, हा हसता खेळता चेहरा असा अचानक काळाच्या पडद्याआड जाईल.
शेवटचे ट्विट 6 तासांपूर्वी
पुनीत राजकुमारने आज सकाळी ट्विट करून चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. 6 तासांपूर्वी त्याचे शेवटचे ट्विट पाहून, अभिनेता आता या जगात नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पुनीतच्या निधनावर सर्व दिग्गज सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेता सोनू सूदने लिहिले, 'हृदयभंग. भाऊ तुझी नेहमी आठवण येईल.