पंजाब : या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अज्ञातांकडून लोकप्रिय गायकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या गायकाची काल शनिवारीच या गायकाच्या सुरक्षेत सरकारकडून घट करण्यात आली होती. या गोळीबारात गायकासोबत असलेल्या तिघांवरही गोळीबार करण्यात आला. (punjabi singer sidhu moosewala shot dead)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबमधील लोकप्रिय गायक असलेला सिद्धू मूसेवालाची (sidhu moosewala) गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. सिद्धूवर मनसाइथील जवाहर गावाजवळ गोळीबार करण्यात आला.  या गोळीबारानंतर सिद्धूला  रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात  सिद्धूला मृत घोषित करण्यात आलं. तर त्याच्यासोबत असलेल्या तिघांवरही गोळीबार झाला. यामध्ये तिघे जखमी झाले. या तिघांवर मानसा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


दरम्यान गायक सिद्धूची हत्या का करण्यात आली, याबाबतचं कारण अस्पष्ट आहे. तसेच एकाएकी असा सर्व प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा तपास केला जात आहे.