Pushpa 2 : साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात पुष्पराजच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील त्याच्या  'पुष्पा 2' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. यासोबतच या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजपूर्वीच केली 1000 कोटींची कमाई 


sacnilk रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'चे थिएटरचे हक्क 640 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. 


पुष्पा 2 ने ओटीटी डीलमध्ये केली बंपर कमाई 


या मोस्ट अवेटेड चित्रपटाने त्याच्या स्ट्रीमिंग अधिकारांमध्येही बंपर कमाई केली आहे. नेटफ्लिक्सने 'पुष्पा 2' चे डिजिटल अधिकार 275 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.


प्री-रिलीज बिझनेसमधून 'पुष्पा 2' चित्रपटाची किती कमाई


'पुष्पा 2' हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, या चित्रपटाने रिलीजपूर्वीच आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये प्री-बिझनेसमधून 220 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर उत्तर भारतात 200 कोटी, तामिळनाडूमध्ये 50 कोटी, कर्नाटकात 30 कोटी, केरळमध्ये 20 कोटी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 140 कोटींची कमाई केली आहे. 



'पुष्पा 2' ची म्यूझिक राईट्समधून देखील बंपर कमाई
 
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाचे म्युझिक राइट्स 65 कोटींना विकले आहेत. निर्मात्यांनी सॅटेलाइट राइट्समधून 85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने नॉन-थिएटर राइट्समधून 425 कोटी रुपये कमावले आहेत.


'पुष्पा 2' चित्रपटातील कलाकार


'पुष्पा 2' या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना आणि फहद फासिल हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे संगीत टी-सिरीजने दिले आहे. यावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील या चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे.