Pushpa 2 OTT Streaming Rights: 'पुष्पा - द राइज'च्या यशानंतर प्रेक्षक 'पुष्पा 2' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनचा सर्वात जास्त चर्चेत असणारा 'पुष्पा 2' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. मात्र, या चित्रपटाचे ओटीटी हक्क चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विकले गेले आहेत. यामधून चित्रपट निर्मात्यांनी बजेटच्या निम्मी कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पुष्पा 2' चे OTT अधिकार डिजिटल प्लॅटफॉर्म Netflix ने खरेदी केले आहेत. चित्रपटाचे निर्माते आणि नेटफ्लिक्समध्ये करोडोंचा करार झाला आहे. आकाशवाणीच्या मते, अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2'साठी नेटफ्लिक्सने निर्मात्यांना 270 कोटी रुपये दिले आहेत. अशाप्रकारे 'पुष्पा 2' डिजिटल अधिकारांच्या बाबतीत सर्वात महागड्या भारतीय चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. 



'पुष्पा 2' या चित्रपटाने 270 कोटी रुपयांना ओटीटी अधिकार विकून चित्रपटाच्या बजेटच्या निम्मी कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' या चित्रपटाचे बजेट जवळपास 500 कोटी रुपये आहे. 


चौथा सर्वात महागडा भारतीय चित्रपट


अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' OTT वर विकला जाणारा चौथा सर्वात महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे.  'KGF Chapter-2' चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याचे हक्क प्राइम व्हिडीओने 320 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रभासचा हा चित्रपट दोन OTT प्लॅटफॉर्मवर विकला गेला होता. ज्यामध्ये Netflix 175 कोटी आणि प्राइम व्हिडीओ 200 कोटी रुपये. या चित्रपटाने OTT प्लॅटफॉर्ममधून एकूण 375 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या क्रमांकावर 'RRR'हा चित्रपट आहे. ज्याचे हक्क Netflix, Zee5 आणि Hotstar ने 385 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 


'पुष्पा 2' चित्रपटामधील 2 गाणी रिलीज


15 ऑगस्टला प्रदर्शित होणारा 'पुष्पा 2' हा चित्रपट आता 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक गीत आणि 'अंगारो' हे गाणं रिलीज झाले आहे. जे प्रेक्षकांना खूप आवडले आहे. सध्या प्रेक्षक 'पुष्पा 2' या चित्रपटाची आतुरतेने वाटत पाहत आहेत.