मुंबई : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु (samantha ruth prabhu) ही कायमच बहुविध कारणांनी चर्चेत असते. नागा चैतन्य याच्याशी असणारं वैवाहिक नातं, त्यानंतर याच नात्यात आलेला दुरावा हे सारंकाही समंथाला चर्चेत आणून गेलं. फक्त समंथाच नव्हे, ओघाओघानं तिचं हे नातंही प्रकाशझोतात आलं. (samantha ruth prabhu )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेक्षकांच्या अतिशय आवडीची ही जोडी नेमकी वेगळी का झाली, याचं कारण आजही समजू शकलेलं नाही. पण, नात्यात वेगळ्या वाटा निवडल्यानंतर आता मात्र समंथा आणि नागा चैतन्य हे दोघंही त्यांच्या आयुष्यात स्थैर्याच्या शोधात दिसत आहेत.



कामामध्ये या दोघांनीही स्वत:ला झोकून दिलं आहे. असं असतानाच त्यांच्याभोवती असणारा माध्यमांचा आणि प्रश्नांचा गराडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. 


याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये समंथाला एका विचित्र प्रश्नाचा सामना करावा लागल्याचं दिसत आहे. 



मुंबई विमानतळातून बाहेर पडत असताना समंथाला एखा छायाचित्रकारानं सर्वनांसमोर, हिंदी येतं का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना समंथानं 'थोडा थोडा' इतकंच म्हटलं आणि ती पुढे निघून गेली. 


समंथानं यापूर्वीच काही मुलाखतींमध्ये आपल्याला हिंदीवर फार प्रभुत्व नसल्याचं म्हटलं होतं. तिच्या उत्तरातूनच तिला हिंदी फारशी जमत नसल्याचं कळलं. पण, तिचा अंदाज मात्र सर्वांचीच मनं जिंकून गेला.