मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला तिच्या कास्टिंग काउचबद्दलच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत तिने आपला कटू अनुभव सांगितला. त्याचबरोबर तिने आर माधवनसोबत असा एक खुलासा केला आहे की, तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सेक्स लाईफला मसालेदार बनवण्यासाठी एका डिशचा मोठा हात असल्याचं तिने  यावेळी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चिंचेची चटणी' खास आहे
खरं तर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुरवीन चावला आणि आर माधवन जोरात हसताना दिसत आहेत.  मुलाखतीमध्ये , तुम्ही तुमचं लैंगिक जीवन मसालेदार कसं बनवता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावंर  सुरवीन म्हणते, चिंचेची चटणी. आणि ती जोर-जोरात हसू लागते. .


आर माधवनला हसू आवरत नव्हतं
त्यांचं हे बोलणं ऐकून आर माधवनही हसायला लागतो. दोघंही इतका वेळ हसतात की, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. यानंतर आर माधवन सांगतो की, चिंचेची चटणी लैंगिक जीवनात मसाला आणेल की नाही माहित नाही, पण चाखायला मजा येईल. हे ऐकून दोघंही पुन्हा हसू लागतात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लोकांच्या मजेदार कमेंट 
 कमेंट्सबॉक्समध्ये लोकं लाफ्टर ईमोजी पाठवत आहेत. त्याचबरोबर युजर्स कमेंटमध्ये लिहित आहेत की,  सुरवीनने आज एक मोठं गुपित उघडलं. सुरवीन आणि आर माधवन एका वेबसीरिजमध्ये दिसले आहेत. 'डीकपल्ड' असे या सिरीजचं नाव असून, विभक्त झालेल्या कपलची ही कथा आहे. या सिरीजमधील कॉमेडी लोकांना खूप आवडली आहे.