Macron Selfie With PM Modi, R Madhavan: बॉलिवूड अभिनेता आर माधवन (R. Madhavan) अलीकडेच पॅरिसमधील 'बॅस्टिल डे' कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (President Emmanuel Macron) उपस्थित होते. माधवनने या दोन्ही दिग्गजांबरोबर सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. आर माधवनच्या आयुष्यात हा एक सुंदर क्षण होता. त्यावर माधवनने एक पोस्ट (R Madhavan Instragram Post) लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि फ्रान्सच्या लोकांसाठी चांगलं करण्याची उत्कटता आणि समर्पण पॅरिसमध्ये 14 जुलै 2023 रोजी झालेल्या बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये स्पष्टपणे दिसून आलं. या क्षणी मला पूर्णपणे आश्चर्य वाटलं. हवेत एका प्रकारची सकारात्मकता आहे आणि एकमेकांबद्दलचा आदर आहे, असं म्हणत माधवनने भावना व्यक्त केल्या आहेत. मी मनापासून विनंती करतो की फ्रान्स आणि भारतची (France India Friendship) दृष्टी आणि स्वप्ने आपल्या सर्वांसाठी योग्य वेळी योग्य परिणाम देतील, असा विश्वास देखील माधवनने व्यक्त केला आहे.


अध्यक्ष मॅक्रॉन यांनी आमच्यासाठी सेल्फी क्लिक केला. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दयाळूपणे आणि प्रेमाने या सेल्फीचा एक भाग होण्यासाठी उभे राहिले. तो असा क्षण होता, जो त्या सेल्फीला खास बनवतो. हा क्षण असाच माझ्या मनात कायम राहील. अतुलनीय नम्रतेबद्दल अध्यक्ष मॅक्रॉन आणि मोदीजींचे आभार. फ्रान्स आणि भारत सदैव एकत्र राहोत, असंही माधवन फोटो (Macron Selfie With PM Modi, R Madhavan) पोस्ट करत म्हणाला आहे.


पाहा पोस्ट 



दरम्यान, माधवनने यावेळी इस्रोने (ISRO) नुकतंच प्रेक्षपण केलेल्या चांद्रयान 3 चा देखील उल्लेख केला. 4 जुलै 2023 रोजी, SEP फ्रान्सच्या मदतीने नंबी नारायणन यांनी बनवलेल्या इंजिनसह चांद्रयान 3 चे आणखी एक नेत्रदीपक आणि यशस्वी प्रक्षेपण झालं. मी त्याच्या महत्त्वपूर्ण आणि अविश्वसनीय मिशनच्या यशासाठी देखील प्रार्थना करतो, असंही माधवन म्हणाला आहे. नंबी नारायण यांच्या आयुष्यावर माधवन याचा नुकताच रॉकेटरी (Rocketry: The Nambi Effect) हा सिनेमा आला होता.