movie review : कसा आहे राझी
दिग्दर्शक मेघना गुलजारनं या आधी फिलहाल आणि तलवार हे दोन सिनेमे आतापर्यंत दिग्दर्शित केलेत. आरुषी हत्याकांडवर आधारित तिच्या तलवार या सिनेमाचं कौतुकही झालं होतं.
जयंती वाघदरे, झी मीडिया, मुंबई : दिग्दर्शक मेघना गुलजारनं या आधी फिलहाल आणि तलवार हे दोन सिनेमे आतापर्यंत दिग्दर्शित केलेत. आरुषी हत्याकांडवर आधारित तिच्या तलवार या सिनेमाचं कौतुकही झालं होतं. आता मेघना राझी हा सिनेमा घेऊन आलीये.. आलिया भट्ट, विकी कौशल, रजित कपूर, शिशिर शर्मा, सोनी राजदान, अमृता खानविलकर स्टारर राझी हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? राझी हा सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. सेहमत या तरुणीची ही गोष्ट. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धासंदर्भातली ही कथा आहे. आपल्या देशापुढे इतर कोणत्याही गोष्टींना महत्त्व न देणाऱ्या एका धाडसी भारतीय गुप्तहेर स्त्रीची कथा यात रेखाटण्यात आली आहे. एका गुप्तचरच्या खासगी आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मेघना गुलजार यांनी केलाय. गुप्तचर सेहेमत जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री आलिया भटनं, यात एका काश्मिरी मुलीची भूमिका साकारतेय. पाकिस्तानी लष्करप्रमुख इक्बाल सय्यद अर्थातच (विकी कौशल) हा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत.
वीस वर्षांची सेहमत आपल्या करिअरचा त्याग करुन एका पाकिस्तानी लष्कर प्रमुखाशी लग्नबंधनात अडकून आपला देश सोडून पाकिस्तानात राहायला जाते. एक गुप्तचर म्हणून ती आपली भूमिका बजावतेय. दुसऱ्या देशात जाऊन सेहेमत ही एक गुप्तचर म्हणून आपले कर्तव्य आणि आपली भूमिका ती कशी निभावते हे बघायचं असेल तर 'राझी' नक्कीच जाऊन पाहायला हवा.
मेघना गुलजार यांच्या तलवार या सिनेमा प्रमाणेच राझी या सिनेमाचा युएसपी आहे याची पटकथा.. खरंतर ज्या पद्धतीनं मेघना गुलजार यांनी या सिनेमातील या सगळ्या घटना एकापोठापाठ एक रंजकपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय ते पडद्यावर पाहताना उत्सुकता वाढवणारं आहे. या कारणानं हा सिनेमा तुम्हाला खिळवून ठेवतो. मेघना गुलजार यांनी सिनेमाला दिलेली ट्रीटमेन्ट कमाल आहे.
अभिनेत्री आलिया भट पुन्हा एकदा प्रेक्षकांना सरप्राईस करणार आहे. कुठल्याही एका साच्यामध्ये न अडकता प्रत्येक जोनरचे सिनेमे ती उत्कृष्टपद्धतिनं पार पाडतेय. तिनं साकारलेल्या सेहमत या व्यक्तिरेखेला तिनं पुर्ण न्याय दिलाय. दुसरीकडे अभिनेता विकी कौशलनंही तितक्याच ताकदीनं आपली व्यक्तिरेखा चोख पार पाडली आहे. या सिनेमात अमृता खानविलकर एका खास भूमिकेत दिसतेय. अमृतानं आपली भूमिका छान साकारली आहे.
राझी या सिनेमातील गाणी, बॅकग्राउंड स्कोर, लोकेशन्स, सिनेमाटोग्राफी या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमा आणखी रंजकदार होतो. जवळपास 30 कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमाचे डिजीटल आणि सेटलाईट राईट्स सिनेमा रिलीज होण्याआधीच विकले गेलेत. यामुळे ब-यापैकी प्रोफिट कमावून राझी हा सिनेमा तसा फायद्यात आहे. त्याच मेघना गुलजार आणि आलिया भटही दमदार जोडी एकत्र असल्यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवरही कमालकरेल यात शंका नाही.
राझी या सिनेमातील हे सगळे फॅक्टर्स पाहता सिनेमाला मिळताय 3.5 स्टार्स.