मुंबई : राधिका आपटेला आज कोण ओळखत नाही. नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अभिनेत्रीला सुरुवातीच्या काळात बॉडीशेमिंगचा सामना करावा लागला आहे. याबद्दल बोलताना राधिका म्हणाली, तिला नाक सरळ करण्यापासून ते ब्रेस्ट सर्जरी पर्यंत करण्यास सांगितलं गेलं होतं. इंडस्ट्रीत या गोष्टींबद्दल बोलणं काही नवखं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधिका आपटेने 'बदलापूर','अंधाधुन' सारख्या सिनेमांतून तिनं साकारलेल्या अभिनयाचं कौतूकही करण्यात आलं आहे. राधिका आपटे 'पार्च्ड' सारख्या सिनेमातनं एकदम बोल्ड अभिनय करताना आपल्याला दिसली आहे. बॉडीशेमिंगबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, ''मी जेव्हा नवीन होते तेव्हा माझ्यावर मोठं प्रेशर असायचं. मला माझ्या ब्रेस्ट आणि चेहऱ्यावर खूप बदल करण्यास सांगितले होते. कामानिमित्तानं केलेल्या पहिल्या एका मीटिंगमध्ये मला सांगितलं गेलं की नाकाची सर्जरी करून घे. दुसऱ्या मीटिंगमध्ये बेस्ट सर्जरी करुन घ्यायला सांगितलं होतं.


मला पायावर देखील काहीतरी करुन घ्यायला सांगितलं होतं. ज्या सर्जरीचं नाव थोडं विचित्र होतं. नंतर माझ्या तोंडाच्या जबड्याला आणि गालांना देखील थोडं भरल्यासारखे वाटण्यासाठी सर्जरी कर म्हणाले होते, पुढे काहीच नाही तर बोटोक्स सर्जरी करायला सांगितली होती. ही सर्जरी त्वचा तजेलदार दिसण्यासाठी केली जाते. त्वचेला सुरुकूत्या असतील तर ही सर्जरी करतात''.


पुढे राधिका म्हणाली, या सगळ्याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. ना या सल्ल्यामुळे माझा आत्मविश्वास डगमगला. उलट यानंतर मी स्वत:वर खूप प्रेम करायला शिकले. स्वत:ची काळजी घेवू लागले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदर करायला शिकले''.