मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचं तिच्या शानदार अभिनयामुळे मोठं फॅन फॉलोविंग तयार झालं आहे. राधिका तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूडमध्ये एक दशकाहून अधिक काळ घालवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधिकाचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात झाला. तिच्या चित्रपटांतील नोंदीही खूप रंजक आहेत. जेव्हा राधिका शास्त्रीय नृत्य 'कथक' शिकत होती, यावेळी एका कास्टिंग डायरेक्टरने तिला पाहिले आणि चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. राधिका 2005 मध्ये शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव सोबत 'वाह लाइफ हो तो ऐसी' चित्रपटात दिसली.


या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती, पण राधिका इथेच थांबली नाही. यानंतर ती बंगाली आणि मराठी चित्रपटांमध्ये दिसली. यानंतर त्यांनी 'रक्त चरित्र', 'रक्त चरित्र 2', 'शोर इन द सिटी', 'बदलापूर', आणि 'हंटर' सारखे चित्रपट केले. 'मांझी' चित्रपटात तिने 'फागुनिया'चे असे पात्र साकारले ज्याचे खूप कौतुक झाले.


परदेशी म्युझिशिनसोबत गुपित लग्न 


राधिका आपटेच्या लग्नाची कहाणी ही खूप वेगळी आहे. तिने 2012 मध्ये परदेशी संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी गुपित लग्न केले. राधिकाने एक वर्ष ही गोष्ट लपवून ठेवली. दोघे 2011 साली भेटले, जेव्हा लंडनला ती नृत्य शिकण्यासाठी गेली होती.



लग्नात नेसली जुनी साडी


राधिका आपटेच्या लग्नाशी संबंधित आणखी एक कथा आहे. फाटलेली जुनी साडी नेसून राधिका तिच्या लग्नाला गेली. एका मुलाखतीदरम्यान, राधिकाने सांगितले होते की, 'माझे रजिस्टर लग्न होते, या दिवशी मी माझ्या आजीची जुनी साडी नेसली होती. या साडीला अनेक छिद्रे होती. पण तरीही मी तिथे साडी नेसण्याचा निर्णय घेतला. कारण मी माझ्या आजीच्या खूप जवळ होते, ती माझी आवडती व्यक्ती आहे. माझ्या लग्नावर फक्त कपड्यांवर भरपूर पैसा खर्च करणाऱ्यांपैकी मी नाही. राधिकाने सांगितले की जरी यानंतर तिने पूर्ण रीतीरिवाजाने लग्न केले, ज्यासाठी तिने एक नवीन पोशाख खरेदी केला. कारण मला त्या दिवशी चांगले दिसायचे होते.