मुंबई : गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता घेतलंय एक नव वळण!


मालिकेत राधिकाचा मेक ओव्हर होतोय, आनंद, पानवलकर, जेनी, दामलेकाका, समिधा आणि रेवती या सगळ्यांच्या सोबतीने ती स्वतःची कंपनी सुरु करतेय. राधिका आता “स्त्री उद्योजिका” म्हणून रसिकांच्या भेटीला येत आहे. आपल्या मुलाकडे अथर्व कडे दुर्लक्ष न करता ती हा डोलारा उभा करणार आहे. हा भाग तुम्हाला झी मराठीवर येत्या ३० मार्चला रात्री ८ वा. पाहता येणार आहे.


गुरुनाथला दिलेला चॅलेंज राधिका पूर्ण करणार आहे. राधिकाच हे बदललेल्या रूप आणि गुरुनाथ - शनायाची उडणारी तारांबळ, येत्या काही भागात तुम्हाला पाहता येणार आहे.