मुंबई : डान्सर, अभिनेता आणि रिअ‍ॅलिटी शो 'डान्स प्लस'चा होस्ट राघव जुयाल याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तो त्याच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतो पण त्याचवेळी चाहत्यांना राघवची 'डान्स प्लस'ची जज शक्ती मोहनसोबतची केमिस्ट्री खूप आवडते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमध्ये राघव नेहमी शक्तीसोबत फ्लर्ट करताना दिसतो आणि याच कारणामुळे दोघांच्या डेटींगच्या अफवाही पाहायला मिळतात. कारण दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाच नाही तर या शोशी संबंधित लोकांनाही आवडते.


आता अशी माहिती मिळत आहे की राघव जुयालच्या हृदयावर शक्ती मोहन नाही तर आणखी एका मुलीचे राज्य आहे आणि त्या दोघांचे काही फोटोही समोर आले आहेत, जे पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.



राघव जुयाल एका परदेशी मुलीला डेट करत असून दोघांचे काही फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. असा दावा केला जात आहे की ही ती मुलगी आहे जिच्या प्रेमात राघव वेडा झाला आहे.


या मुलीचे नाव सारा अरहुसियस असून ती स्वीडनची आहे. विशेष म्हणजे साराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर राघवसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत, त्यामुळे ही बातमी खरी असल्याचे दिसते.


 



सारा आणि राघव 2017 मध्ये भेटले होते आणि दोघे 2018 पासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. सारा आणि राघवच्या जवळच्या लोकांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती आहे. त्याला आपले नाते गुप्त ठेवायचे आहे आणि म्हणूनच त्याने आपले नाते जगापासून लपवून ठेवले आहे.


 सारा आणि राघव यांची पहिली भेट एका ट्रेकींग दरम्यान झाली होती. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. सारा कामानिमित्त अनेकदा भारतात येते आणि यादरम्यान ती राघवसोबत चांगला वेळ घालवते.