Ragini Khanna Fitness Secret: स्लिम आणि फिट राहण्याच्या खूप पद्धती आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या उपायांचा अवलंब करतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची क्षमता आणि व्यायामाची गरजही वेगवेगळी असते. अभिनेत्री रागिणी खन्नाला हा मार्ग अचूकपणे सापडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रागिणी म्हणते, सोमवारची सकाळ जोशपूर्ण असेल, तर सगळा आठवडा आनंदात जातो. 'ससुराल गेंदा फूल' मालिकेत सुहाना ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या अभिनेत्रीने सोमवारचा दिवसही सुहाना मौसम म्हटले आहे. स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साईट कू वर आपला फ्रेश फोटो पोस्ट करताना ती म्हणते, 




सोमवार सकाळचे दृश्य... सकाळी धावून आल्यावर विजेचा धक्का बसतो! हा आहे माझा खासगी लूक. घरी माझ्या या रूपाला "आइंस्टीन" म्हणतात. (मी स्वतला बुद्धिमान भासवण्याचा प्रयत्न करते आहे.) रागिनी खन्नाची ही पोस्ट आणि सोबत शेअर केलेल्या फोटोला चाहते भरभरून लाईक करत आहेत. विविध कमेंट्स करून चाहते त्यावर व्यक्त होतानाही दिसत आहेत.


आठवडाभर धावपळ केल्यावर एक दिलासा असतो, की लवकरच रविवार येईल. आठवडाभर वेळ न मिळाल्याने एकुलता एक रविवार गाठत ढीगभर वैयक्तिक कामे संपवायची असतात. मात्र अनेकदा होते असे, की ही कामं करतानाच नकळत रविवार संपून जातो. तरीही सोमवारचे स्वागत उत्साहात करण्याची कला काही लोकांना अवगत असते.