Swara Bhaskar and Fahad Ahmad Reception : बॉलिवूड अभिनेत्री (Swara Bhaskar) आणि तिचा पती फहाद अहमद (Fahad Ahmad) हे गेल्या अनेक गेल्या दिवसांपासून त्यांच्या रजिस्टर मॅरेजमुळे चर्चेत होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाची पत्रिका देखील चांगलीच व्हायरल झाली होती. मात्र, लग्नाच्या आधीचे सगळे कार्यक्रम केल्यानंतर त्या दोघांनी कोणत्याही परंपरेनुसार लग्न करण्यास नकार दिल्याचे समोर आले होते. दरम्यान, त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये कॉंग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) पोहोचले होते. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधी ही स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पोहोचल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओत पाहायला मिळत आहे की त्यांच्या आजुबाजूला खूप सिक्योरिटी आहे. रिसेप्शन पार्टीला हजेरी लावल्यानंतर ते स्टेजवर जात स्वरा आणि फहाद यांच्यासोबत फोटो काढतात. यावेळी राहुल हे फक्त स्वरा आणि फहाद यांच्यासोबत फोटो काढत नाही तर तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांसोबत गप्पा देखील मारतात. हा व्हिडीओ शेअर करत विरल भयानीनं ही माहिती दिली की तिथे असलेल्या सगळ्यांशी खूप चांगल्या प्रकारे बोलत होते. राहुल गांधी यांनी रिसेप्शनमध्ये हजेरी लावल्यामुळे स्वराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. (Rahul Gandhi Video From Swara and Fahad Reception) दरम्यान, स्वरानं तिच्या रिसेप्शनमध्ये परिधान केलेल्या मंगळसुत्रनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


पाहा व्हिडीओ -




व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'तुकडे तुकडे गॅंगचे लोक एकत्र आले.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अशा प्रकारे यांचे शाहीनबाग आणि जेएनयूसाठी असलेला पाठिंबा पाहायला मिळत आहे', अशा प्रकारे अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी स्वराला ट्रोल केलं आहे. स्वरा आणि फहाद यांनी 12 फेब्रुवारी रोजी रजिस्टर मॅरेज केलं होतं. त्यांच्या त्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हे फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले होते. दरम्यान, फहाद हे  समाजवादी पार्टीचा युवा नेता आहेत. (Swara Bhaskar Troll) ईटाइम्सनं देखील त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.